वांयां जातों देवा – संत तुकाराम अभंग – 651

वांयां जातों देवा – संत तुकाराम अभंग – 651


वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥१॥
आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥
करावें तें काय । न कळें अवलोकितों पाय ॥२॥
तुका म्हणे दान । दिलें पदरीं घेईन ॥३॥

अर्थ

हे,देवा मी वाया जात आहे.मला भक्ती व सेवा कशी करावी ते कळत नाही.आता तुमच्या पुढे हात जोडून मि निवांत उभा आहे.आणखी काय करावे ते कळत नाही म्हणून तुमचे पाय अवलोकित आहे.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ज्या प्रकारचे दान माझ्या पदरात घालाल ते दान मी घेईन.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

वांयां जातों देवा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.