टाळ दिंडी हातीं – संत तुकाराम अभंग – 650

टाळ दिंडी हातीं – संत तुकाराम अभंग – 650


टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती ॥१॥
जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥
जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥२॥
तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥३॥

अर्थ

टाळ विणा हे वैकुठाचे मार्ग आहे.ज्यांना कोणाला वैकुंठाला जायचे आहे त्यांनी हरीच्या दासां बरोबर त्यांच्या सोबत जावे.व पुण्याची शिदोरी लवकर तयार करावी ते सर्वांना साद देत आहेत तिकडे सर्वांनी लक्ष द्यावे.तुकाराम महाराज म्हणतात ते सर्व वैष्णव विठ्ठलाचे नाव मोठ मोठ्याने घेत व गात जात आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

टाळ दिंडी हातीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.