करीं ऐसें जागें – संत तुकाराम अभंग – 649

करीं ऐसें जागें – संत तुकाराम अभंग – 649


करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥१॥
प्रेम झोंबे कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥
राहो लोकाचार । पडे अवघा विसर ॥२॥
तुका म्हणे ध्यावें । तुज व्यभिचारभावें ॥३॥

अर्थ

कायम तुझ्या पाया पडून तुला आम्ही जागे करतो.तुझे प्रेम आमच्या कंठात ठसलेले राहो.माझा देह कायम तुम्हाला लोटांगण घालो.आता माझा लोकाचार नाहीसा होवो, मला सर्वांचा विसर पडो. तुकाराम महाराज म्हणतात हे प्रभू मला तुझे व्यभिचार भावाने ध्यान घडो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

करीं ऐसें जागें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.