आले भरा केणें – संत तुकाराम अभंग – 647

आले भरा केणें – संत तुकाराम अभंग – 647


आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥१॥
उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥
वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥२॥
तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥३॥

अर्थ

पंढरीच्या बाजारात जन्म मरण चुकते असा माल आला आहे. तो तुम्ही घ्या जेथे पुंडलीकाने पांडुरंग पपरमात्म्याला विठेवर उभा केला आहे अशा पंढरी गावात इनामाची पेठ भरले आहे. तो माल घेण्याकरता सर्व जण सरसावले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात बापहो, तुम्हाला जर हा माल हवा असेल तर तुम्ही खरे माप (म्हणजे भक्ती भावाने तिथे जा.)घेवून या.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आले भरा केणें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.