शेवटीची विनवणी – संत तुकाराम अभंग – 640
शेवटीची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥
पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥२॥
तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥३॥
अर्थ
शेवटची विनवणी हि संताना आहे ती तुम्ही संतजनांनी ऐकावी एवढेच माझे म्हणणे आहे,माझा विसर तुम्हाला कधीच पडू देऊ नका.याच्या पुढे अधिक काय बोलू?तुम्हाला सारे काही कळत आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पाया पडलो आहे,माझ्या वर कृपेची सावली करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
शेवटीची विनवणी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.