बोलायाचा त्यासीं – संत तुकाराम अभंग – 64

बोलायाचा त्यासीं – संत तुकाराम अभंग – 64


बोलायाचा त्यासीं ।
नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडली संतनिंदा ।
तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥
जळो त्याचें तोंड ।
नको दृष्टीपुढें भांड ॥२॥
तुका म्हणे देवा ।
तया दुरी मज ठेवा ॥३॥

अर्थ
जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबध येऊ नये .हे गोविंदा, जे तुला विसरतात, ते संतांची निंदा करतात .अश्या नास्तिकांचे तोड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही, असे लोक माझ्या दृष्टिस पडू नयेत .तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


बोलायाचा त्यासीं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.