मोकळें मन रसाळ – संत तुकाराम अभंग – 639
मोकळें मन रसाळ वाणी । याचि गुणीं संपन्न ॥१॥
लक्ष्मी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥
नमन ते नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥३॥
अर्थ
मनुष्याचे मन मोकळे असावे वाणी रसाळ असावे याच गुणांनी मनुष्य संपन्न असावा.यालाच लक्ष्मी संपन्न म्हणावे त्यांचे जगणे म्हणजे भाग्याचे आहे.सतत नम्रता त्यांच्या अंगी असते,ती नम्रता कधी बदलत नाही.तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांचे नाव घेतेले,तरी मानला संतोष होतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मोकळें मन रसाळ – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.