कांडील्या कुटिल्या होतो – संत तुकाराम अभंग – 637

कांडील्या कुटिल्या होतो – संत तुकाराम अभंग – 637


कांडील्या कुटिल्या होतो मांडा । आळसें धोंडा पडतसे ॥१॥
राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥
तरटापुढें बरें नाचे । सुते काचें मुसळ ॥२॥
तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणें ॥३॥

अर्थ

चांगले कणिक असले तरच मांडा हा पदार्थ चांगला होतो.अन्यथा कनिकाचा धोंडाच पदरात पडतो.आम्ही जे तुम्हाला काही सांगतो त्याचा राग मनात धरू नको.तरट संबंध घेतले तर मुसळ त्यामुळे झिजत नाही.पण दोरीचे वेढे मुसळाला असले आणि दोरी सतत फिरवली तर त्या मुळे मुसळाला काचे पडतात. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या मूर्ख मनुष्याला जर वठणीवर आणायचे असेल तर काठी हे त्याचे सार आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

कांडील्या कुटिल्या होतो – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.