धन्य ते संसारीं – संत तुकाराम अभंग – 636

धन्य ते संसारीं – संत तुकाराम अभंग – 636


धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥
येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥
लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥२॥
मधुरा वाणी होटीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥३॥

अर्थ

ज्यांच्या अंगी दया आहे ते या जगात धन्य आहे.कारण ते येथे फक्त उपकारासाठी आलेले आहेत,त्यांचे घर हे वैकुंठा मध्ये आहे.ते कधी लटिके(खोटे)बोलत नाही,ते देहासंबंधी उदास असतात.तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या ओठात कायम मधुर वाणी असून,त्याच्या पोटी लोकांचे गुणदोष सहन करण्या इतकी भरपूर जागा आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

धन्य ते संसारीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.