चतुर मी जालों आपुल्या – संत तुकाराम अभंग – 635

चतुर मी जालों आपुल्या – संत तुकाराम अभंग – 635


चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता स्फुंद अंगीं ॥१॥
आतां पुढें वांयां जावें हें तें काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूतांच्या मत्सरावरी बुद्धी ॥२॥
तुका म्हणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥३॥

अर्थ

मी चतुर झालो असा मोठा अभिमान माझ्या अंगी आला आहे,पण तो माझ्या अंगी देवाविषयी भाव नसल्या मुळे रिता म्हणजे पोकळ आहे.आता पुढे मी वयाला जाईल हे काही नवल नाही,कारण माझ्या मध्ये काम क्रोध यांनी वास केला आहे.जगाच्या मधील सर्व गुणदोष एकत्र होऊन माझ्या मनात ते शिरले आहे.भुताच्या म्हणजे प्राणीमात्रांचे मत्सर करावा आशी माझी बुद्धी झाली आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी लोकांना उपदेश करतो पण मात्र मी एकाही दोषापासून सुटलो नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

चतुर मी जालों आपुल्या – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.