कोठें देवा आलें – संत तुकाराम अभंग – 634
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥
न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥२॥
तुका म्हणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥
अर्थ
माझ्या अंगी मोठेपणा का आला?मी दिन होते तेच बरे होते देवा.संतांची सेवा हे उत्तम साधन आहे,आणि आवडीने मी हरी नाम गाईन.मी कोठे हि गेलो,तरी मला कोणी विचारले नसते त्या योगाने मी समाधानी झालो असतो सुखी झालो असतो.तुकाराम महाराज म्हणतात लोकांनी माझा अव्हेर केला असता तर केशीराजाने माझा सांभाळ केला असता.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कोठें देवा आलें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.