नव्हे आराणूक परि – संत तुकाराम अभंग – 633

नव्हे आराणूक परि – संत तुकाराम अभंग – 633


नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥१॥
पंढरीसि जावें उद्वेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥२॥
तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाठी ॥३॥

अर्थ

प्रपंचात राहून समाधानी राहतो, जो पांडुरंगाचे चिंतन करतो,त्याला पांडुरंगच साह्य करतो.पंढरीला जावे असे जो मनात ठरवतो,त्याला पांडुरंग भेटल्या शिवाय राहत नाही.जरी देहात बळ नसले,देह पराधीन असला तरी पांडुरंगाचे चिंतन कधीही सोडू नये.तुकाराम महाराज म्हणतात चिंतन करता करता देह पडला तरी त्याची परवा करू नये.परत पांडुरंगाची भक्ती करण्या साठी मनुष्य जन्म मिळतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नव्हे आराणूक परि – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.