मनीं वसे त्याचें आवडे – संत तुकाराम अभंग – 632
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥
जातीचें तें झुरे येर येरासाठी । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥
भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरीजन प्राणसखे ॥३॥
अर्थ
आपल्याला ज्याच्या बद्दल आवड आहे,त्याचे बोलणे हे नेहमी आवडते.असे वाटते कि,त्याचा समाचार घ्यावा. एका जातीचे म्हणजे एकाच आवडीचे दोघे एक मेकांसाठी झुरत म्हणजे झिजत असतात.ते शरीराने दूर पण मनाने एक असतात.एकमेकांच्या भेटीची ते अपेक्षा धरतात,त्यांना कुणी थांबविले तर ते त्यांच्या विषयी पुन्हा पुन्हा विचारतात,तुकाराम महाराज म्हणतात हरीभक्त हे माझ्या जीवाचे जीवन आहे.ते माझे प्राण साखेच आहेत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मनीं वसे त्याचें आवडे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.