कानडीनें केला मर्‍हाटा – संत तुकाराम अभंग – 63

कानडीनें केला मर्‍हाटा – संत तुकाराम अभंग – 63


कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार ।
एकाचें उत्तर एका न ये ॥१॥
तैसें मज नको करूं कमळापति ।
देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥
तिनें पाचारिलें इल बा म्हणोन ।
येरु पळे आण झाली आतां ॥२॥
तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न ।
तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥

अर्थ
एका कानडी भाषा बोलणार्‍या स्त्रीने मराठी भाषा बोलणारा नवरा केला , त्यांना एकमेकांचे बोलणे न कळल्याणे विपर्‍यास निर्माण होत असे .तशी माझी स्थीति हे कमलापती, तू करू नकोस, मला संतसहवास घडू दे .त्या कानडी स्त्रीने त्याला ‘इल बा’ (इकडे या) म्हंटले .त्याने बा’ म्हणजे बाबा असा अर्थ घेतला व भलता गैरसमज करून तो दूर पळू लागला. तुकाराम महाराज म्हणतात अशी परिस्थीती झाली म्हणजे जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते.


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


कानडीनें केला मर्‍हाटा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.