हेंचि माझें धन – संत तुकाराम अभंग – 629

हेंचि माझें धन – संत तुकाराम अभंग – 629


हेंचि माझें धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥
येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥
सांभाळिलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥२॥
जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥३॥

अर्थ

देवा तुमचे चरण वंदन करणे हेच माझे धन आहे.आमचे चित्त तुम्हाला अर्पण करून आम्ही जीवन व्यतीत करू.देवा माझ्या सारखा अनाथ जिवाचा तुम्ही सांभाळ केला.तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला हात जोडून विनंती करतो की,तुम्ही माझ्या जवळ राहा मी तुमचा दिन दास आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

हेंचि माझें धन – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.