कल्पतरु रुया नव्हती – संत तुकाराम अभंग – 624

कल्पतरु रुया नव्हती – संत तुकाराम अभंग – 624


कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इछितिया ॥१॥
उदंड त्या गाई म्‍हैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥
तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥

अर्थ

जगात बाभळीचे आणि रुई चे झाडे थोडी आहेत का?पण आपल्याला हवी ती फळे कल्पतरूच देऊ शकतो.गाई,म्हैसी,शेळ्या अनेक आहेत,पण त्या सर्वांपेक्षा कामधेनु वेगळीच आहे.तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जो देवाचे दर्शन घडवितो असा संत महात्मा मिळणे फार दुर्लभ आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

कल्पतरु रुया नव्हती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.