गाढवाचें तानें – संत तुकाराम अभंग – 622
गाढवाचें तानें । पालटते क्षणक्षणें ॥१॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥
उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥२॥
तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥३॥
अर्थ
गाढवाच्या शिंगारा मध्ये क्षणाक्षणाला बदल झालेला दिसतो.त्या प्रमाणे अधम मनुष्याचा स्वभाव असतो.त्याचे मन कधी एकनिष्ट नसते.गाढवाचे पोर जन्मल्यावर चांगले दिसते.पण ते जसे जसे वाढत जाते तसतसे ते कुरूप दिसते. तुकाराम महाराज म्हणतात गाढव केव्हाही ओरडते.त्याला काळ वेळ कळत नाहि.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
गाढवाचें तानें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.