सुख पाहतां जवापाडें – संत तुकाराम अभंग – 62

सुख पाहतां जवापाडें – संत तुकाराम अभंग – 62


सुख पाहतां जवापाडें ।
दुःख पर्वता एवढें ॥१॥
धरीं धरीं आठवण ।
मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥
नेलें रात्रीनें तें अर्धें ।
बाळपण जराव्याधें ॥२॥
तुका म्हणे पुढा ।
घाणा जुंतीजसी मूढा ॥३॥

अर्थ
जीवनात सुख हे फार थोडे असते, दुःख मात्र पर्वतायेवढे असते .ते दुःख कमी करण्यासाठी संतवचन, संत्सहवास आवश्यक असतो .मानवाच्या आयुष्याचि अर्धी वर्ष रात्री झोपण्यात जातात, बाकीचे बालपन, म्हतारपणात, आजारपणात जातात .तुकाराम महाराज म्हणतात, हे मूर्खा, असे आयुष्य निरर्थक गेले तर जन्म-मृत्युच्या घाण्यामध्ये तू बैलासरखा फिरत राहशील


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


सुख पाहतां जवापाडें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.