माझी भक्ति भोळी – संत तुकाराम अभंग – 618
माझी भक्ति भोळी । एकविध भावबळी ॥१॥
मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥
आतां अनारिसा । तेथे न व्हावें सहसा ॥२॥
तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥
अर्थ
माझी भक्ती भोळी आहे.मी फार एकनिष्ट तुमच्याशी आहे.असा छान चाललेला भक्तीचा सोहळा सोडून मी का निराळा राहू?देवा तुझ्याशी माझे असे नाते जुळले आहे की आता मी तुझ्याशी बिलगून राहावे.तुकाराम महाराज म्हणतात तू आता तुझे पाय दोन्ही जोडून निट उगाच उभा रहा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
माझी भक्ति भोळी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.