तुमचा तुह्मीं केला – संत तुकाराम अभंग – 617

तुमचा तुह्मीं केला – संत तुकाराम अभंग – 617


तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥१॥
कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥
कासया हो रूपा । नांवा आलेति गा बापा ॥२॥
तुका म्हणे आतां । न सरे हवाले घालितां ॥३॥

अर्थ

तुम्ही सगुण रूपात येऊन तुम्हालाच अडकवून घेतले आहे,आता चुकवा चूकवी का करता?आता आम्हला तुम्ही मायाजाळात कसे गुंतवू शकाल?तुम्ही आम्हाला तुमच्या भक्ती विषयी शहाणे केलेत.तुम्ही नावा रुपाला का आलात?तुकाराम महाराज म्हणतात आता कोणाचाही हवाला देऊन चालणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

तुमचा तुह्मीं केला – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.