आधार तो व्हावा – संत तुकाराम अभंग – 616

आधार तो व्हावा – संत तुकाराम अभंग – 616


आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥१॥
तुम्हांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥
सेवेच्या अभिळासें । मन बहु जालें पिसें ॥२॥
अरे भक्तपराधीना । तुका म्हणे नारायणा ॥३॥

अर्थ

मला तुझा आधार व्हावा अशी माझी मनापासून इच्छा(आस)आहे.तुमच्या पाशी सर्व काही आहे मला जर त्यातून थोडे दिले तर तुम्हांला काय कमी पडणार आहे?तुझ्या सेवेच्या इच्छेने माझे मन वेडावून गेले आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे भक्त पराधीना (भक्तांच्या आधीन असणाऱ्या) माझ्या अंतकरणाचे समाधान कर नारायणा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आधार तो व्हावा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.