सांगों देवा नेणा काय – संत तुकाराम अभंग – 613
सांगों देवा नेणा काय । बोलाची आवडी ॥१॥
वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥
आवडीच्या करा ऐसें । अंतर्वासें जाणतसां ॥२॥
तुका म्हणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥३॥
अर्थ
हे प्रभू तुमचे अमृतासारखे शब्द नेहमी कानावर पडावे असे वाटते.हे तुम्हाला वारंवार सांगावे लागेल काय?हे विश्वंभरा थट्टेने देखील माझ्याशी चुकवा चुकाव करू नकोस.माझ्या ज्या काही आवडी आहेत त्या तुम्ही पूर्ण करा,तसे तुम्ही अंतर्यामी आहात.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझ्याशी समाधानाने बोलाल तर मी मानाने मोकळा होईल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सांगों देवा नेणा काय – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.