वर्म तरि आम्हां दावा – संत तुकाराम अभंग – 612

वर्म तरि आम्हां दावा – संत तुकाराम अभंग – 612


वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥
बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥
द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥२॥
तुका म्हणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥३॥

अर्थ

तुझ्या भेटीचे वर्म काय आहे ते दाखव,ते वर्म मी कसे जाणून घेऊ?विषय सुखात रंगून माझी वृत्ती हीन झाली आहे.म्हणून मी तुझ्या चरणी शरण आलो आहे.तुम्ही जर मला धीर दिला तर,तुझ्या ठायी माझे मन स्थिर होईल.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपल्या सत्ता बळाने माझ्या सारख्या बाळकाचे प्रेमाने रक्षण करावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

वर्म तरि आम्हां दावा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.