काय आह्मीं आतां – संत तुकाराम अभंग – 611
काय आह्मीं आतां पोटचि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मुण ॥१॥
ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥
काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥२॥
तुका म्हणे काय गुंफोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥३॥
अर्थ
देवा आम्ही आता भक्तपणाचा आव आणून या भोळ्या भाबड्या माणसांना फसवून आमचे पोटच भरावे काय?तुमचे असेच मत असेल तर मला सांगा.उगाचच आमचा जीव कासावीस होत आहे.काव्याची रचना करून आम्ही केवळ शब्दांची जोडत करत रहावे काय? तुकाराम महाराज म्हणतात या दंभाच्या दुकानांमध्ये गुंतून राहून स्वतःचा घात करून घ्यावा काय?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
काय आह्मीं आतां – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.