म्हणउनी दास नव्हे – संत तुकाराम अभंग – 610
म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥
कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मीच माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥
कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥२॥
तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥३॥
अर्थ
मी अनुभवाने स्वामी पुढे बोलतो की मी तुमचा दास नाही.कारणमी एवढा अट्टाहासाने तुझ्यापुढे बडबड करतो आहे तरीदेखील तू त्याला काहीच प्रत्युत्तर का देत नाहीस?अहो देवा प्रेम आणि बोलण्यात रसाळपणा जर आपल्या दोघांमध्ये नसेल तर मग माझ्या चित्तामध्ये तुमचे विषयी विश्वास कसा उत्पन्न होईल.तुकाराम महाराज म्हणतात हे कृषिराजा तुम्ही सर्व चतुराची शिरोमणी आहात त्यामुळे माझ्या बोलण्याचा तुम्ही तुमच्या मनाशीच विचार करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
म्हणउनी दास नव्हे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.