मैत्र केला महाबळी ।
कामा न ये अंतकाळीं ॥१॥
आधीं घे रे रामनाम ।
सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥
नाहीं तरी यम ।
दांत खातो करकरा ॥२॥
धन मेळविलें कोडी ।
काळ घेतल्या न सोडी ॥३॥
कामा न ये हा परिवार ।
सैन्य लोक बहु फार ॥४॥
तंववरी तुमचे बळ ।
जंव आला नाहीं काळ ॥५॥
तुका म्हणे बापा ।
चुकवीं चौर्याशींच्या खेपा ॥६॥
अर्थ
महाबलवान मित्र जोडलेस तरि ते अंत:काळी उपयोगी पडत नाही .तेव्हा मृत्यु येण्याआधी रामनाम संपत्ति तू जमवुन ठेव .रामनामाचि संपत्ति नसेल तर यम (काळ) कराकरा दांत खाईल .धन-संपत्ति कितीही मिळवली तरी काळाचा आघात हा होणारच आहे .तुझ्याजवळ सैन्य, परिवार, नातेवाईक कितीही असले तरी शेवटी कोणीच कामाला येणार नाहीत .जो पर्यन्त काळाचा आघात होणार नाही तो पर्यंत तुझी शक्ती कामे करील .तुकाराम महाराज म्हणतात, अहोबापांनो चौर्यांशीचा फेरा चुकविण्यासाठी, तुला राम नामाचे साधन जमविले पाहिजे .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.