नाहीं उल्लंघिले कोणाचे – संत तुकाराम अभंग – 608
नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥१॥
आशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान निंश्चितीचें ॥ध्रु.॥
दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥२॥
तुका म्हणे तुम्हां लाज येत नाहीं । आम्हां चिंताडोहीं बुडवितां ॥३॥
अर्थ
मी कोणत्याही श्रेष्ठांचे वचनाचे उल्लंघन केले नाही,असे असता आमच्या पासून नारायण का दूर झाला?याच शंशायाने मन नारायणाला आळवीत आहे.या शंशायामुळे माझ्या मनाची समाधान स्थिती स्थिर नाही.तुम्हाला तुमच्या दासांचा विसर पडतो हा तर अनुचित प्रकार आहे सर्व धर्मनीती तुमच्या पायापाशी चा आहे.तरी तुम्ही असे का वागता? तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला चिंतेच्या डोहामध्ये बुडवतांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नाहीं उल्लंघिले कोणाचे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.