काय कृपेविण घालावें – संत तुकाराम अभंग – 607

काय कृपेविण घालावें – संत तुकाराम अभंग – 607


काय कृपेविण घालावें सांकडें । निंश्चिती निवाडें कोण्या एका ॥१॥
आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥
धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥२॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुर ॥३॥

अर्थ

तुझी कृपा असल्या शिवाय आम्ही तुझ्यावर कशी साकडे घालावे,म्हणून आपल्यावर संकट घालणे योग्य वाटत नाही.आम्ही पूर्वी प्रमाणेच दिन पणाने तुमच्या पुढे काकुळतीस येऊन आर्ततेने हाक मारत राहू.भय धरून आता चिंता करत काय बसू?तुमच्याशी नाते जोडले आहेना त्या आप्त पणाचा काय उपयोग.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भावहिनजीव आहोत.म्हणून देव आमच्या पासून दूर गेला आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

काय कृपेविण घालावें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.