तुम्हां होईल देवा – संत तुकाराम अभंग – 604
तुम्हां होईल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥
पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥
आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन ते ॥२॥
तुका म्हणे देह देईन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥३॥
अर्थ
आहो देवा तुम्हाला आमचा विसर पडेल त्यामुळे आम्ही सारखे तुमच्या दारी येऊन तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत.तुम्ही या कडे लक्ष द्यावा पतीताला तुम्ही पावन करता असें तुम्हांला ब्रीद आहे.ती जबाबदारी तुम्ही का घेत नाही ते सांगा?मी द्रव्य अथवा अर्थाला भुकेला नाही,तेव्हा मला भलत्या थापा मारून मी कशालाही फसणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझा देह अभिमान सहित तुम्हा वरून ओवाळून टाकेल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
तुम्हां होईल देवा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.