तुम्ही साच नुपेक्षाल हा – संत तुकाराम अभंग – 603

तुम्ही साच नुपेक्षाल हा – संत तुकाराम अभंग – 603


तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥१॥
कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥
सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥२॥
तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हां केवा काय आला ॥३॥

अर्थ

तुम्ही मला टाळणार नाही हा भरवसा मला आहे.तुम्ही मग असे का समजता की,मी अधीर आहे.माझा उद्धार तुम्ही लांबणीवर का टाकला आहे?एकदा काय ती आमची करकर मिटवून टाका.आमच्या करकरी पासून तुमची सुटका होणार नाही हे जर तुम्हाला कळले आहे तर एवढे का विनवणी करायला लावत आहात?तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही फार सभाग्यवान आहात देवा,कारण मला मुक्त करणे फारसे कठीण नाही पण तरीदेखील तुम्ही माझा उद्धार करण्याविषयी एवढा कंजूष पणा का दाखवत आहात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

तुम्ही साच नुपेक्षाल हा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.