आम्ही बळकट झालों – संत तुकाराम अभंग – 602
आम्ही बळकट झालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥
झालें तेंव्हा झालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावे झाले ॥ध्रु.॥
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुध्द त्यासी शुद्ध बुद्ध व्हावें ॥२॥
तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तूं ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आम्ही बळकट झालों – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.