उगेचि हें मन राहातें – संत तुकाराम अभंग – 601

उगेचि हें मन राहातें – संत तुकाराम अभंग – 601


उगेचि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साठ होती ॥१॥
काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥
नानाछंदें आम्हां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥३॥

अर्थ

माझे मन जर निश्चळ राहिले असते तर उगाच एवढी तळमळ का करावी लागली असते?तुमचे कौतुक मला कळत नाही सर्वोत्तम खेळ तुम्हीच खेळता.आमच्या जीवाला तुम्ही नाना छंदाने नाचवता.आणि तुम्ही अनेक प्रकारच्या त्यांच्या पुढे भलत्या प्रकारची हाव वाढविता.तुकाराम महाराज म्हणताततुम्ही तुमची कीर्ती वाढविण्यासाठीच आमची चेष्टा करतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

उगेचि हें मन राहातें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.