वळितें जें गाई – संत तुकाराम अभंग – 60
वळितें जें गाई ।
त्यासि फार लागे काई ॥१॥
निवे भावाचे उत्तरीं ।
भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥
न लगती प्रकार ।
कांहीं मनाचा आदर ॥२॥
सांडी थोरपणा ।
तुका म्हणे सवें दीना ॥३॥
अर्थ
गाई-गुरे वळणाऱ्या गुराख्याला परमेश्वर भक्ती करण्यासाठी कष्ट करावे लगत नाही त्यांना कर्मकांडाची आवशकता भासत नाही .त्याच्या मनातील भक्तिभाव व शुद्ध आचरण पाहुन परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो .परमेश्वराला वश करुण घेण्यासाठी कोणत्याही दिखाऊ पणाची त्यांना गरज नसते .तुकाराम महाराज म्हणतात, जो आपला अहंकार, मनपान, मोठेपणा विसरून हरीला शरण जातो, त्याला परमेश्वर वश होतो .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
वळितें जें गाई – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.