मागायाची नाहीं इच्छा – संत तुकाराम अभंग – 596

मागायाची नाहीं इच्छा – संत तुकाराम अभंग – 596


मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचुं ॥१॥
लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥
हिशोबें तें आलें घ्यावें । ते तों ठावें सकळांसी ॥२॥
तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥३॥

अर्थ

अहो मला जर देवाला काही मागायचे नाही तर मग मी देवाजवळ संकोच धरण्याचे काय कारण आहे? कोणत्याही प्रकारची इच्छा मनात धरून मी खोट्याची स्तुती करणार नाही.जे काही हिशोबाने मिळते ते घेणे हे सर्वांना समजते.तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही दर्शनच देणार नसाल तर तुमची भक्ती का करायची?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

मागायाची नाहीं इच्छा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.