पावटणी पडणें पायां – संत तुकाराम अभंग – 597
पावटणी पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥१॥
घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां हे ॥ध्रु.॥
न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥२॥
अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षी ते ॥३॥
अर्थ
देवा अरे आम्ही तुझ्या पायरीच्या देखील पाया पडतो तेही अगदी भक्तिभावाने परंतु तरीदेखील तुझ्या मनात आमच्या विषयी काही प्रेम उत्पन्न होत नसेल तर तुमचा उद्धार करशील कसा?साक्षात भेटीत जे घडेल तेच खरे आणि सर्वानांच बरे दिसते.जर एखाद्या गोष्टीची प्रत्यक्ष भेट झाली नाही तर त्याविषयी नुसतेच फोर्ट गप्पा मारून काय उपयोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी न बोलता अबोल्याने राहतो,माझे अंतकरण साक्षीला ठेवतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पावटणी पडणें पायां – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.