आश्चर्य तें एक झालें – संत तुकाराम अभंग – 595

आश्चर्य तें एक झालें – संत तुकाराम अभंग – 595


आश्चर्य तें एक झालें । मना आलें माझिया ॥१॥
मढयापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥
न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥२॥
तुका म्हणे कैंचा बोला । शोधा विठ्ठला माझिया ॥३॥

अर्थ

देवा माझ्या मनात एक गोष्ट आली आणि त्याचे मला आश्चर्य वाटत आहे एखादा मानव प्रेता जवळ रडत बसतो व त्याला करुणा भाकतो परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही अगदी त्याप्रमाणे आम्ही तुला प्रार्थना करतो ती हि व्यर्थ आहे. एखाद्याचे खोटे कृत्य पाहिल्यावर राग का येऊ नये तुम्ही खोटे पणाने वागला म्हणून मला तुमचा राग येतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घे विठ्ठला आता काय शोधत बसला आहात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आश्चर्य तें एक झालें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.