जैशासाठीं तैसें व्हावें – संत तुकाराम अभंग – 593

जैशासाठीं तैसें व्हावें – संत तुकाराम अभंग – 593


जैशासाठीं तैसें व्हावें । हें बरवें कळलेंसे ॥१॥
उदास तूं नारायणा । मीही म्हणा तुम्हीच ॥ध्रु.॥
ठका महाठका जोडा । हे धडफुडा लागासी ॥२॥
एकांगीच भांडे तुका । नाही धोका जीवित्वे ॥३॥

अर्थ

जशास तसे वागावे हे आम्हाला कळले आहे.हे नारायणा,तुम्ही सर्व गोष्टीं पासून उदास आहे.तसा मी हि उदास आहे.तुमच्या बाबतीत हि मी उदास आहे.तुम्ही ठक आहत तर आम्ही महाठक आहोत.हा तुमचा आणि आमचा योग आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाशी एकांगीच भांडत आहे,मला जिवाचीही भीती नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जैशासाठीं तैसें व्हावें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.