लटिका देव म्हणतां – संत तुकाराम अभंग – 592
लटिका देव म्हणतां ऐसा । संदेहसा वाटतसे ॥१॥
ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥
तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही लटिके(खोटा) आहात इतके म्हणण्या विषयी संदेह माझ्या मनात आला आहे.तुमची सेवा करणाच असे माझ्या अनुभवास आले आहे.देवा तुम्ही शून्य स्थित रहता हे खरे आहे पण मी त्याला भेंडाळा म्हणजे एक प्रकारची दुष्कीर्तीच मानतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या कोणत्याही क्रियेत कसलेही प्रकारचा ताळमेळ नसतो तुम्ही फार चपळ आहात एका ठिकाणी तुम्ही अजिबात स्थिर नाहीच.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
लटिका देव म्हणतां – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.