प्रीतिभंग माझा केला – संत तुकाराम अभंग – 591

प्रीतिभंग माझा केला – संत तुकाराम अभंग – 591


प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा कां जी तुह्मीं ॥१॥
न म्हणऊनि कांहीं न ठेवीचि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥
न देखोचि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥२॥
तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खवळिलें ॥३॥

अर्थ

अहो पांडुरंगा तुम्ही माझ्या भक्तिरसाचा प्रीतीचा भंग केला आहे की नाही ते तुम्ही सांगा?म्हणूनच मी तुमच्या मोठे पणाचा पर्वा ठेवणार नाही.म्हणूनच आम्ही एकेकी वर्मावर आलो आहे.आता तुमची निंदा करताना मी मागे पुढे पाहणार नाही,कारण आता तुमचे व आमचे काहीच नाते उरले नाही.तुकाराम महाराज म्हणतात आता अंतरासी अंतर म्हणजे तुमच्यात व आमच्यात अंतर पडले आहे त्यामुळे मी आता तोंड खवळीले आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

प्रीतिभंग माझा केला – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.