दानें कांपे हात – संत तुकाराम अभंग – 59
दानें कांपे हात ।
नावडे तेविशीं मात ॥१॥
कथी चावटीचे बोल ।
हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥
नव जाती पाप ।
तीर्था म्हणे वेचूं काय ॥२॥
तुका म्हणे मनीं नाहीं ।
न ये आकारातें कांहीं ॥३॥
अर्थ
ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो व् ज्याला दानधर्म करण्याचा सल्ला दिला तर अवडत नाही .ज्याला कथेच्या वेळी फक्त चावट बोल बोलने आवडते, दुधात हींग घातले असता ते वाया जाते, तसे त्याचे भाषण ढोंगिपणाचे असते .त्याचे पाय तीर्थ यात्रेला वळत नाहीत; कारण तो गरीब, दरिद्रयाचे ढोंग करतो .तुकाराम महाराज म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला मनापासून वाटत नसेल तर ती गोष्ठ त्यांच्या हातून कधीच घडत नाही .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
दानें कांपे हात – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.