निर्गुणाचे घ्यावें गुणासी – संत तुकाराम अभंग – 589

निर्गुणाचे घ्यावें गुणासी – संत तुकाराम अभंग – 589


निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एका एकीं भिन्न भेद घडे ॥१॥
तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तेचि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥
आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे अंगा आली कठिणता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥३॥

अर्थ

निर्गुण असे तुझे रूप आहे.असे असता मी जेव्हा तुझे दर्शन घेऊ पाहतो तेव्हा त्यावेळी अद्वैत नाहीसे होते आणि व्दैत उत्पन्न होते.देवा आता यापुढे तुझ्या आणि माझे काही पटणार नाही कारण मला तू जसा आहेस तसाच आवडतोस.आपल्या पासून आम्ही वेगळे नसावे म्हणून आत्ता पर्यंत मी तुमची पुष्कळ विनवणी केली.तुकाराम महाराज म्हणतात पण तुम्ही मन कठोर केले आम्हाला वेगळे ठेवले मीही तुमच्या सारखे मन कठोर करतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

निर्गुणाचे घ्यावें गुणासी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.