चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ – संत तुकाराम अभंग – 588
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तेचि किती काळ वाढवावें ॥१॥
अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥
करूं आला तों तों केला लवलाहो । उरोचि संदेहो दिला नाहीं ॥२॥
तुका म्हणे मोह परतेचि ना मागें । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥३॥
अर्थ
हरीच्या चिंतनेने मी अश्या ठिकाणी स्थिर झालो आहे की,आता चिंतन किती वेळ वाढवावे हेच कळत नाही.याबद्दल अबोलना धरण्याची वेळ आली आहे.माझ्या कडून जितका परमार्थ करवा तितका मी केला आहे मना मध्ये आता कोणताही संशयच राहिला नाही.तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या आतला जो मोह आहे तो आता गेला आहे,तो परत माघारी येतच नाही.म्हणून मला आता त्यागाचाही त्याग झाला आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.