वासनेच्या मुखीं आदळूनि – संत तुकाराम अभंग – 587
वासनेच्या मुखीं आदळूनि भीतें । निर्वाहा पुरतें कारण तें ॥१॥
या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥
सर्वकाळ हाचि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥२॥
तुका म्हणे जों जों भजनासी वळे । अंगे तों तों कळे सन्निधता ॥३॥
अर्थ
वासनेच्या मुखामध्ये भत्ता टाकावा व आपल्या निर्वाहा पुरतेच मनुष्याने कार्य करावे.चित्तात कायम समाधान असणे हिच खरी नारायण आपल्या अंतरात असल्याचि खरी खुण आहे.आणि सर्व काळ हाची विचार करावे.आत्मत्वाचा विचार करण्यासाठी आपली विवेकबुद्धी नेहमी तत्पर असावी. तुकाराम महाराज म्हणतात जसे जसे आपण हरिच्या भजना कडे वळू तसे तसे आपल्याला देवाची सान्निध्यता झाली की नाही ते कळते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
वासनेच्या मुखीं आदळूनि – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.