नव्हती माझे बोल – संत तुकाराम अभंग – 586
नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥१॥
कांहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ध्रु.॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥२॥
ज्याचें तोचि जाणें । मी मापाडें तुका म्हणे ॥३॥
अर्थ
मी तुम्हाल जे काही सांगत आहे ते मी स्वतःच बोलत नसून विठ्ठलच तुम्हाला उपदेश करत आहे.या बद्दल तुम्ही काहीच खंती धरू नका,मी जे सांगतो तसे वागा यातच तुमचे हित आहे.एखाद्याने जर चांगली वाट सांगितली तर ती वाट टाकून जाणारा माणसाच्या अंगी अहंभाव आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे हित तोच जाणतो माझ्या मुखा वाटे विठ्ठल बोलतो आहे त्याचे सत्यत्व तो विठ्ठल जाणतो.मी केवळ मापाडी आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नव्हती माझे बोल – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.