चित्त ग्वाही तेथें लौकिकाचे – संत तुकाराम अभंग – 585
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचे काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥
मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥२॥
भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥३॥
तुका म्हणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होईल त्यांचा ॥४॥
अर्थ
देवाची भक्ती करणे विषय आपले चित्त जर आपल्याला साक्षी असेल तर इतरांच्या साक्षी काय गरज आहे आपल्या सहित आपल्याजवळच आहे.आत बाहेर सर्व ठिकाणी देव व्यापून आहे असा विचार मनात सतत असणे हाच खरा भाव.आपल्या ठिकाणचा शुध्द भाव दुसऱ्याला सांगण्याचे कारणच नाही.तो अपोपच लोकांना समजून येत असतो.जो परमानंद रस भोगत आहे आपल्या अंतरंगात रममाण आहे त्याला बाहेरील रंगाची चाडच नसते.तुकाराम महाराज म्हणतात ज्यामध्ये शुध्द भाव आहे त्याचा स्तुती करणारा भाटच नारायण होईल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.