माझ्या मुखावाटा नयो हें – संत तुकाराम अभंग – 584
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें हे संतान द्रव्य कोणां ॥१॥
फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तेचि साधे ॥ध्रु.॥
नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥२॥
तुका म्हणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥३॥
अर्थ
माझ्या मुखावाटे कोणाला संतती किंवा धन मिळावे हे वाचन कधीच निघू नये.कारण संपत्ती आणि संतती या गोष्टींमुळे तो मनुष्य विनाकारण पतन होऊन दुखाचा भागीदार होईल.माझ्या मनाने कधीही कोणाची निंदा किंवा स्तुती अगदी तत्परतेने कधीही ऐकू नये.तुकाराम महाराज म्हणतात देवाची प्राप्ती होणे असाध्य होते कारण मनुष्य आशा मोह यांच्या जाळ्यात गुंतलेला असतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
माझ्या मुखावाटा नयो हें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.