आठवे देव तो करावा – संत तुकाराम अभंग – 583
आठवे देव तो करावा उपाव । येर त्यजीं वाव खटपटा ॥१॥
होई बा जागा होई बा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥
जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघसि ना ॥२॥
तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥३॥
अर्थ
ज्या उपायाने देवाची आठवण येते तोच उपाय कर.बाकीच्या खटपटी तू टाकून दे.जागा हो रे बाबा,जागा हो रे बाबा,व्यर्थ कशाला शिन करतोस.तू ज्ञानाच्या ओझ्याने भवरूपी डोहात बुडालास तर वर निघू शकणार नाहीस.तुकाराम महाराज म्हणतात तुला जर वाटत असेल देवाची प्राप्ती व्हावी तर देवाविषयी दृढ भक्तिभाव ठेव ज्ञानी पणाच्या अहंकाराने तुला काहीही प्राप्त होणार नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आठवे देव तो करावा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.