उपकारासाठीं केले हे – संत तुकाराम अभंग – 582

उपकारासाठीं केले हे – संत तुकाराम अभंग – 582


उपकारासाठीं केले हे उपाय । येणेंविण काय चाड आम्हां ॥१॥
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥

अर्थ

आम्ही जे उपाय सांगितले ते केवळ दुसऱ्यावर उपकार घडावा म्हणून आमचे त्या वाचून काय नडले होते?लोक भवसागरात बुडत आहेत ते मला देखवत नाही म्हणून त्यांचा कळवळा येतो.तुकाराम महाराज म्हणतात पण माझ्या डोळ्याने मी या भवसागरात गुंतलेले लोक भोग भोगतानी पाहणार आहे करणात भोग भोगतानाच त्यांना आम्ही केलेल्या उद्देशाची आठवण येईल मग त्यांना चांगल्याप्रकारे कळेल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

उपकारासाठीं केले हे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.