सोनें दावी वरी तांबें – संत तुकाराम अभंग – 580
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साठी विकुं पाहे ॥१॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥
क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तोचि भिन्न भिन्न काढी ॥२॥
तुका म्हणे थीता आपणची खोटा । अपमान मोठा पावईल ॥३॥
अर्थ
तांब्याच्या एखाद्या वस्तूला वरती सोन्याचा मुलामा दिला,तर खरा सोनार त्या दोन्हीतील फरक ओळखतो.आणि दोन्हीही ते वेगवेगळे करतो.पाणी आणि दुध हे एकत्र असले तरी दोन्हीचाही स्वाद मात्र वेगवेगळा आहे आणि एखादा जाणकार मनुष्य दूध आणि पाणी हे दोन्ही एकत्र आहे हे लगेच ओळखतो.तुकाराम महाराज म्हणतात या वरून आपण असे समजावे की,जो खोटा आहे त्याचा मोठा अपमान होईल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सोनें दावी वरी तांबें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.