भाग्यें ऐसी झाली जोडी – संत तुकाराम अभंग – 575
भाग्यें ऐसी झाली जोडी । आतां घडी न विसंबे ॥१॥
विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥
अवघें आतां काम सारूं । हाचि करूं कैवाड ॥२॥
तुका म्हणे खंडूं खेपा । पुढें पापपुण्याच्या ॥३॥
अर्थ
माझे भाग्य आहे की मला पांडुरंगाच्या चरणाची जोड लाभली आहे.या लाभ झालेल्या क्षणाला विसंरणार नाही.विटेवर असलेले विठ्ठलाचे समचरणच ध्यानी धरावे.अशी खुण मला संतानी सांगितली आहे.आता मी सर्व इतर कामे आणि साधना बाजूला ठेवीन आणि विठोबाच्या चरणाचे चिंतन करण्याचा विचारच सतत बाळगीन.तुकाराम महाराज म्हणतात पाप आणि पुण्याच्या येरझाऱ्या आपल्याला सोसावे लागतील जन्म-मृत्यूचा त्रासही आपल्याला सोसावा लागेल तोच आता आपण नाहीसा करू.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
भाग्यें ऐसी झाली जोडी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.